रमेश तांबे, ओतूर
ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या मंत्रघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे (Chaitanya Maharaj Palkhi) ओतूर (ता. जुन्नर) (Otur Junnar) येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) बुधवारी सकाळी ११ वाजता प्रयाण झाले.
याबाबत श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे संस्थापक महादेव तांबे, अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे हे या पालखी सोहळ्याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले की, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महारांजाची ओतूर येथे संजीवन समाधी आहे.यामुळे ओतूर येथून जाणाऱ्या, या पालखीला पंढरपूर पायी वारी सोहळ्यात मानाचे स्थान आहे.ओतूर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे 64 वे वर्ष आहे.
मंगळवारी दि. २५ रोजी या पालखी सोहळ्यास सदगुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरा पासुन प्रस्तानास सुरूवात झाली,टाळ मृदुंगाच्या गजरात व राम कृष्ण हरि या मंत्र घोषात पालखी सोहळ्याने ओतूर शहराला नगर प्रदक्षिणा घातली नंतर पालखीचा पहिला मुक्काम ओतूर शहरातील मुख्या चौक पांढरी मारूती मंदिरात झाला.तद्नंतर बुधवारी दि. २६ रोजी सकाळी ९ वाजता वैभव डेरे सपत्नीक अभिषेक व पुजा केली.शंकर भगवंत डुंबरे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले. तद्नंतर ओतूर येथून सकाळी साडे दहा वाजता पालखीचे प्रयाण करण्यात आले.
श्री बाबाजी चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक महादेव तांबे,अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे,उपाध्यक्ष रघुनाथ तांबे,ज्ञानेश्वर पानसरे,शांताराम महाराज वाकर,विलास घुले,शांताराम पानसरे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे,गंगाराम महाराज डुंबरे,महेंद्र पानसरे,राजेंद्र डुंबरे,जितेंद्र डुंबरे,सागर दाते,संतोष नवले,रोहिदास घुले,प्रकाश डुंबरे,पाडुरंग ढोबळे,ज्ञानेश्वर पानसरे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले,तुषार थोरात आदी ग्रामस्थ,महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, येथील प्रगतीशील शेतकरी धनंजय शशिकांत तांबे यांच्या बैलजोडीला पालखी रथासाठी मान मिळाला.
ओतूर येथून सकाळी पालखी प्रयाण वेळी भव्य मिरवणूक निघाली होती त्यात चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल,ताशा,लेझीम व झेंडा पथकाचा सहभाग होता.या शिवाय परीसरातील शेकडो भाविक भक्तही सहभागी झाले होते.संपूर्ण वातावरण भक्त मय होऊन सर्वत्र रामकृष्ण हरी,ज्ञानोबा तुकाराम जयघोष चालू होता. सदर पायी पालखी ओतूर, आळे, बेल्हा, पाडळी, आळकुटी, लोणीमावळा, रांधे दरोडी फाटा, वडझिरे,पारनेर,पाणोली घाट, पिंपळनेर, राळेगण सिद्धी, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, घोडेगाव, चांदगाव, टाकळी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, सिध्दटेक, बारडगाव, येसवडी, राशीन, कोर्टी, विहाळ, वीट, झरे, वांगी कविटगाव ,कंदर, टेंभुर्णी, अरण, मोडलिंब, आष्टी, बाबळगाव मार्गे पालखी १९ दिवसांनी रविवार दि.१४ जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.श्री क्षेत्र पंढरपुर येथील ६५ एकरच्या शेजारी,नदी पलीकडे, ( बोराटे मळा ) येथे सात दिवसांची विश्रांती नंतर रविवार दि.२१ जूलै रोजी परतीचा प्रवास सुरू होणार असून पंढरपूर, भेंडीशेगाव, तोंडले, खुडूस, माळशिरस नातेपुते, धर्मपुरी, फलटण, काळज, लोणंद, जेजुरी, सासवड, वडकी, फातिमानगर, विश्रांतवाडी. आळंदी राजगुरूनगर, नारायणगाव ओझर मार्गे शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी पालखीचे ओतूर येथे पुनरागमन होणार आहे. वारकऱ्यांचा हा प्रवास ३९ दिवसांचा आहे. या पालखी सोहळ्याचे नियोजन श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा व ओतूर ग्रामस्थ करत आहे.