21 C
New York

Assembly Monsoon Session : ‘मविआ’चा मास्टर प्लॅन, अधिवेशनात सरकारला ‘या’ मुद्द्यावरून घेरणार

Published:

मुंबई

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन (Assembly Monsoon Session) उद्यापासून सुरू होणार आहे. शिंदे सरकारचे (Shinde Govt) हे अधिवेशन शेवटचे अधिवेशन असणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती (MahaYuti) सरकार करिता हे अधिवेशन अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारकडून मोठ्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विरोधकांनी (Maha Vikas Aghadi) राज्यातील विविध प्रश्नांवर राज्य सरकारला (MVA)घेरण्याची तयारी केली आहे.

त्याचसोबत सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असताना सरकार गंभीर नसल्याचे सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेण्याचा प्रयत्न असणार आहे. यात प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलेले आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी, पेपर फुटी, बेरोजगारी, शेतकऱ्यांना पीक कर्ज, कायदा सुव्यवस्था, पोलीस भरती रद्द यासह अनेक मुद्द्यांवर विरोधात राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनात ‘हेमुद्दे गाजणार

  • शेतकरी कर्जमाफी
  • मराठा- ओबीसी आरक्षण वाद
  • घाटकोपर होर्डींग्ज दुर्घटना
  • दुधाला कमी भाव
  • नीट परीक्षा रद्द
  • बोगस बियाणे
  • जास्त दरात बियाणे विक्री
  • बेरोजगारी
  • अटल सेतू भेगा
  • शेतकऱ्याला मदत न करणे
  • शेतकरीला पीक कर्ज न देणे
  • कायदा सुव्यवस्था
  • पोलिस भरती रद्द
  • परीक्षा घोळ
  • पेपर फुटी
  • पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण
  • महागाई
  • इतर ही मुद्दे महत्त्वाचे असणार आहे.
  • शक्तीपिठ महामार्ग शेतकरी विरोध
  • ⁠पुण्यातील अंमली पदार्थ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img