21 C
New York

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

Published:

नवी दिल्ली

दिल्ली दारू घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) मनी लाँड्रींगचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सीबीआयनं अटक (Arrest) केली. अरविंद केजरीवाल यांची सीबीआयनं (CBI) मंगळवारी तिहार कारागृहात जाऊन चौकशी केली. त्यानंतर आज सकाळी त्यांना सीबीआयनं अटक केली.

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज मोठा धक्का बसला आहे. सीबीआय आज त्याला घेऊन दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहोचली होती. सीबीआयने आज केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर हजर करून कोठडीची मागणी केली होती, जी न्यायमूर्ती अमिताभ रावत यांच्या खंडपीठाने स्वीकारली.

या प्रकरणात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले, त्यांनी सांगितले की केजरीवाल यांना अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात कोणताही आदेश काढण्यात आला आहे.

विक्रम चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती मीडियाकडून मिळाली होती. सीबीआयने दाखल केलेल्या रिमांड अर्जाची प्रतही आम्हाला देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे केजरीवालांचे वकील म्हणाले.

दिल्ली दारू घोटाळ्यात धोरण ठरवताना 100 कोटी रुपयाची कथित लाच घेतल्याचा आरोप सीबीआयनं केला. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आम आदमी पक्षानं 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याच्या पैशाचा वापर केल्याचा दावाही तपास यंत्रणांनी केला. आम आदमी पक्षानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img