Saie Tamhankar : सई ताम्हणकर (Saie Tamhankar) ही नेहमीच तिच्या चित्रपटांच्या किंवा वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेगवेगळ्या शब्दांची पोस्ट करत होती. यामधून नक्कीच ती काहीतरी धमाका करणार असल्याची हिंट चाहत्यांना मिळालीच होती. सईने तिच्या वाढदिवसादिवशी एका खास गोष्टीची घोषणा केली आहे. सईने स्वतःचा नवीन बिझनेस सुरु केला आहे. सईने वाढदिवसानिमित्त ‘मॅडम एस’ (madame S) हा Merchandise ब्रँड लाँच केला आहे. अगदी हटके असं या ब्रॅण्डला नाव दिलंय त्यात ब्रॅण्डची गोष्ट देखील तितकीच खास आहे. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’ असा या गोष्टीचा अर्थ आहे.
सईने स्वतःचा लॉन्च केला नवा ब्रँड
Saie Tamhankar : २०२३-२०२४ हे वर्ष सोयीसाठी खूप खास आहे असं म्हणायला हरकत नाही. बॅक टू बॅक असलेले प्रोजेक्ट आणि धमाकेदार काम करून ती नेहमीच चर्चेत असते. आता सईची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नवीन कपड्यांचा ब्रँड सईने लाँच केला आहे. या सगळ्या गोष्टीबाबत सई म्हणाली, हि संकल्पना माझ्या डोक्यात अशी नव्हती पण मला मात्र फॅन्सच्या मनात नुसतंच राहायचं नव्हतं तर उरायचं पण आहे आणि म्हणून मी या निमित्ताने करू शकते. यासाठी मी फॅन्ससोबत मनापासून जोडली जाईन आणि या ब्रँडमुळे त्यांचा मनात राहीन अशी ही या मागची संकल्पना होती. म्हणूनच हा ब्रँड लाँच केला, असं सई म्हणाली.
अखेर मुहूर्त मिळालाच! ‘इमर्जन्सी’ सिनेमा ‘या’ दिवशी झळकणार चित्रपटगृहात
सई पुढे म्हणाली, ‘मॅडम एस’ हा फक्तच ब्रँड नाहीये तर माझ्याकडून प्रेक्षकांना आणि चाहत्यांना असलेलं एक रिटर्न गिफ्ट आहे. वाढदिवसादिवशी तो लाँच करणं तासारखा दुसरा मुहूर्त नाही म्हणून हे फॅन्ससाठी असलेलं खास गिफ्ट आहे. या Merchandise ला सर्वचजण खूप प्रेम देतील, यात शंका नाही. मी फक्त पेपरवर उद्योजिका झाली आहे. तुम्ही सगळेचजण याला भरभरून प्रेम द्याल. असंच धमाकेदार काम करण्यासाठी मला प्रेरणा द्याल अशी आशा आहे असंही सईने म्हंटल आहे.
ब्रँडचं नाव कसं काय सुचलं?
ब्रँडचं नाव कसं असावं हा प्रश्न असताना, मला माझ्या अगदी जवळच्या मित्राने छान असं माझ्या पर्सनॅलिटीला शोभेल असं नाव सुचवलं आहे. यातूनच ‘मॅडम एस’ हा Merchandise ब्रँड आम्ही लाँच केला. क्वीन ऑफ स्यासी ट्यूडसारखा असलेला माझा स्वभाव आणि यातूनच मला कमाल असं नाव माझ्या Merchandise ला मिळालं आहे. आणि हा माझा ब्रँड बर्थडेदिवसापासूनच तुमचा झालाय असं मी म्हणेन.