कालापासून 18 व्या लोकसभा संसदेच अधिवेशन सुरू झालं आहे. (Lok Sabha) मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बहुमत नसल्याने संसदेत विरोधी पक्षनेतेपद खाली होतं. मात्र, यावेळी काँग्रेसने चांगली मुसंडी मारल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद असणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी स्वीकारणार का याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी ( Rahul Gandhi) या पदासाठी तयार झाल्याचं समजतय.
Rahul Gandhi पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक
काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये राहुल गांधींनी पहिल्या बाकावर विरोधी पक्षनेत्यांच्या स्थानावर बसून हे संकेत दिल्यामुळेही हा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर इंडिया आघाडीने पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक आघाडी उघडली असून काँग्रेस नेते राहुल गांधी या आघाडीचे नेतृत्वRahul Gandhi पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक करत आहेत.
Rahul Gandhi बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेत
लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी सरकारला राहुल गांधींनी घेरावं असा आग्रह काँग्रेसमधून आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर राहुल गांधीच विरोधी पक्षनेते असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे.
जुनी पेन्शन योजना संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi बोलण्याची अधिक संधी
राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याची रणनीती आखण्यात आली आहे अशी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते झाल्यास राहुल यांना लोकसभेत बोलण्याची अधिक संधी मिळेल व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने स्थान मिळेल, असाही काँग्रेसचा विचार असल्याचं समोर आलं आहे
Rahul Gandhi चर्चेत थेट सहभागी
सरकार आणि विरोधकांमधील चर्चेत थेट सहभागी होऊन राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष्य करतील. त्याचप्रमाणे सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांना असलेले कायदेशीर स्थान पाहता, या पदाचा राहुल गांधी पुरेपुर उपयोग करतील असाही दावा या सूत्रांनी केला आहे.