शंकर जाधव, डोंबिवली
नियमितपणे पाणी बिल भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. डोंबिवलीजवळील (Dombivli) दावडी, गोळीवली, पिसवली भागात पाणी टंचाई असल्याने नागरिकांच्या या समस्येचा भाजपच्या (BJP) पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भोकटे यांना जाब विचारला. या समस्येबाबत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते येत्या शुक्रवार 28 तारखेला उपोषणास बसणार आहेत.
भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, माजी नगरसेवक जालिंदर पाटील,रमाकांत पाटील यांनी एमआयडीसी कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भोकटे यांची भेट घेतली. डोंबिवलीजवळील दावडी,गोळीवली,पिसवली भागात अनेक दिवसांपासून पाणी समस्या भेडसावत असून एमआयडीसीतून कानाडोळा का केला जात आहे याचा जाब विचारला.याबाबत कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले, मी, माजी नगरसेवक जालिंदर पाटील,रमाकांत पाटील. मोरेश्वर भोईर हे पाणी समस्येवर २८ तारखेला उपोषणास बसणार आहे.नियमित पाणी बिल भरूनही नागरिकांना टॅकरने पाणी विकत घ्यावे लागते.एमआयडीसी कार्यालयात अनेक निवेदन देऊनही पाणी समस्या सुटली नाही. मात्र एमआयडीसी विभाग मोठमोठ्या गृहसंकुलालाभरमसाठ पाणी पुरवठा करतात.