21 C
New York

Vamanrao Sathe : कल्याणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामनराव साठे यांचे निधन

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

कल्याणातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामनराव साठे (Vamanrao Sathe) यांचे मंगळवार २५ जून रोजी दुपारी त्यांच्या कल्याण येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने दु:खद निधन (Passed Away) झाले. ते ९३ वर्षाचे होते त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली व मोठा परिवार आहे.

वामनराव कल्याण जनता सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य होते. तसेच कल्याणच्या सर्व सामाजिक चळवळींचे साक्षीदार होते. भारतीय जनसंघ महाराष्ट्रात पसरविण्यात त्यांनी खूप परिश्रम घेतले. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील हिंदूंच्या आधिकारावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब करण्याचे कामात कै. ॲड. भाऊसाहेब मोडक, कै. भाऊराव सबनीस व कै. म.ना. सहस्रबुद्धे यांच्याबरोबर त्यांचा मोलाचा वाटा होता. कल्याण जनता सहकारी बँकेच्या उभारणीत व प्रगतीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच बरोबर छत्रपती शिक्षण मंडळ,स्त्री शिक्षण मंडळ, सुभेदारवाडा शताब्दी गणेशोत्सव अध्यक्ष, अशा गाव म्हणून असलेल्या सर्व कामांत त्यांचा कायम सहभाग राहीला आहे. आपले बंधू शिल्पकार भाऊराव साठे यांना दिल्ली, मुंबई व नागपूर येथील भाऊंनी बनविलेले जगप्रसिद्ध छत्रपतींचे पुतळे तेथे जाऊन उभारण्यात सहाय्य केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img