मुंबई
नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तिच खेळी भाजपवर (BJP) उलटली आहे. कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुर्यकांता पाटील या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता सुर्यकांता पाटील तब्बल ७५ वर्षांनी घरवापसी करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. परंतु 10 वर्षा पूर्वी भाजपची केंद्रात सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवत सुर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. मागील 10 वर्षा पासून भाजपाने पाटील यांना कुठलेही जवाबदारी दिली नाही. त्यामुळे सुर्यकांता पाटील ह्या भाजप पक्षावर नाराज होत्या. आज सुर्यकांता पाटील यांची शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश झाला. नांदेड जिल्ह्यात सुर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.