भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या बारा दिवसांपासून सुनीता आणि त्याचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते 5 जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि 13 जूनला परतणार होते. परंतु गेल्या बारा दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाही. आता त्यांच्याकडे केवळ 27 दिवसांचे इंधन शिल्लक आहे. त्याचे अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम लीक होत असल्यामुळे ते परतू शकत नाही.
Sunita Williams हेलियम गळती
मात्र, नासाच्या बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे सलग चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. लँडिंग 18 जूनपर्यंत ढकलले जात असल्याचे सांगून पहिली घोषणा 9 जून रोजी करण्यात आली. दोघांनाही कोणताही धोका नसल्याचे नासाने म्हटले आहे. ते ज्या अंतराळयानात परतणार होते, त्यात हेलियम गळती होत आहे. त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतराळयानाची क्षमता ४५ दिवस असून १८ दिवस झाले आहेत. (sunita williams)
स्टार लाइनर या यानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर येण्यास अडचणी येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या यानामध्ये हेलियम गळती झालेली आहे. आणि काही इंजिन देखील बंद पडलेली आहे. त्यामुळे ते पृथ्वीवर परत येऊ शकत नाही. या बातमीमुळे सगळ्याच भारतीयांना काळजी लागलेली आहे. परंतु आता तज्ञांनी या समस्येवर तोडगा काढून त्यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्याचे आश्वासन दिलेले आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत खूप जास्त चर्चा चालू आहे. तसेच सोशल मीडियावर अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सचा ड्रॅगन या नावाचा वापर करावा अशी देखील चर्चा सुरू आहे. परंतु तज्ञांच्या मते हा एक छोटासा बिघाड पृथ्वीवर आणण्यासाठी धोकादायक ठरेलच असे नाही.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा एक छोटा बिघाड पृथ्वीवर उतरण्यासाठी धोकादायक ठरतीलच असे नाही. जास्तीत जास्त, अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच थोडा वेळ स्पेसएक्सच्या ड्रॅगनची वाट पाहावी लागेल इतकंच. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी Butch Wilmore यांना यापूर्वी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर जून 5 रोजी स्टारलाइनरद्वारे अंतराळात पाठवण्यात आलं. मात्र 25 तासांच्या प्रवासात यानात हेलियम गळती आणि काही इंजिन बंद पडल्याचं उघड झालं. याबाबत बोलताना बॉइंग स्टारलाइनर कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणाले, हेलियम सिस्टीम अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अद्याप इंजिनियरिंग टीम या समस्येचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आता नासासह भारतीयांना देखील सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतीची आस लागली आहे.