21 C
New York

Kalyan : भरधाव कारची रिक्षा धडक, धडकेत रिक्षा चालक जखमी

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

एका भरधाव चारचाकी गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना रविवार 23 तारखेला कल्याण (Kalyan) पश्चिम खडकपाडा परिसरात घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात रिक्षाचे नुकसान झाले आहे .

शैलेश ढोणे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहें.खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास करत चारचाकी वाहनचालक मुकेश तरे याला ताब्यात घेतले आहे. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा बारावे गावात शैलेश ढोणे आपल्या कुटुंबासह राहतात . रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शैलेश ढोणे हे आपले रिक्षा घेऊन घराच्या दिशेने जात असताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक शैलेश ढोणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांना वाहन चालकाविरोधात तक्रार नोंदविली. खडकपाडा पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेट वरून वाहनमालकाचा शोध घेतला.पोलिसांनी गाडी चालक मुकेश तरे याला ताब्यात घेतले. तर त्याची ईरटीका गाडी ही जप्त करण्यात आली आहे .याप्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत . खडकपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी याप्रकरणी गाडी चालक मुकेश तरे याला ताब्यात घेतलं असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे गाडी चालका विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img