मुंबई
घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या या मोठ्या योजनेत मोहरे ठरलेल्या शिक्षकांना अटक करणे म्हणजे खऱ्या गुन्हेगारांपासून आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. हा एक तमाशा आहे. NEET घोटाळा हा केंद्रपुरस्कृत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अटक करण्यात आलेले ‘दलाल’ स्वबळावर देशव्यापी घोटाळा करू शकले नसते. व्यापम घोटाळ्याप्रमाणेच या संघटित गुन्हेगारीचा मुख्य सूत्रधार सरकारच आहे.