18.9 C
New York

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Published:

मुंबई

जुनी पेन्शन योजना लागू ( Old Pension Scheme ) करण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ( State Government Employees ) मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार असल्याची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर ( Nitin Kareer ) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे याचा फायदा सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटना प्रतिनिधी आणि राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात मंत्रालयात सोमवारी 25 जून बैठक झाली. या बैठकीला या विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सुधारित पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून लागू होईल आणि त्याचे शासकीय आदेश जारी होतील, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहेत. याशिवाय केंद्राप्रमाणे 4 टक्के महागाई भत्ता त्वरीत मंजूर करण्यात येईल. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्तावही मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असून निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम 12 वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img