21 C
New York

Nilesh Lanke : लंकेंचा विखेंना धोबीपछाड; ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

Published:

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर लंकेनी आपण दिल्लीत जाऊन फाडफाड इंग्रजी बोलणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ( दि.25) नव्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी लंकेंनी फाडफाड इंद्रजीत खासदारकीची शपथ घेतली. त्यामुळे खासदार झाल्यानंतर आपण फाडफाड इंग्रजीत बोलणार असल्याचा शब्द लंकेनी खरा करून दाखवत विखे पाटलांच्या टीकेला उत्तर दिले आहे. (Nilesh Lanke Taks Oath Aa a MP In Fluent English)

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके ( Nilesh Lanke ) विरुद्ध विखे ( Sujay Vikhe ) . त्यात विखे आणि लंके यांच्यामध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर विविध आरोप आणि टीका करण्यात आली. त्यात विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी खासदार म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत गेल्यानंतर ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार’ असं म्हणत विखेंनाआव्हान दिलं होते. त्यानंतर आज लंकेंनी संसद भवनात फाडफाड इंद्रजीत खासदारकीचे शपथ घेत विखेंना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

निकमांची सरकारी वकील नियुक्ती रद्द करा, प्रकरण कोर्टात

Nilesh Lanke कुणी आईच्या पोटातू शिकूून येत नाही

प्रचारकाळात ज्यावेळी विखे आणि लंकेंमध्ये इंग्रजी भाषेवरून जुंपली होती. त्यावेळी लंकेंनी मला इंग्रजीचे धडे लावण्याची गरज नाही. तसेच कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. पण माणूस पाण्यात पडला की, पोहायला शिकतो. तशीच ही परिस्थिती आहे. मी एकदा अंदाज घेतो. अद्याप मला संसद कुठे आहे? हे देखील माहित नाही. त्यामुळे आत गेल्यानंतर मी शिकेल की समोरच्या व्यक्तीला कोणती भाषा अभिप्रेत आहे त्याच भाषेत मी बोलेल. समोरच्याला माझी भाषा कळत नसेल तर त्याला जी भाषा समजते. त्या भाषेतच मला माझा प्रश्न मांडावा लागेल. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. असं म्हणत यावेळी लंकेंनी सुजय विखेंना इंग्रजी भाषेवरून टोला लगावला होता.

Nilesh Lanke नीलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेताच पारनेरमध्ये जल्लोष

लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना इंग्रजी व हिंदीतून संसदेत बोलण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान लंके यांनी स्वीकारले. खासदार होताच नीलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीतून शपथ घेतली. त्यामुळे पारनेर येथे आज लंके समर्थकांनी जल्लोष केला. लंकेंचं सुजय विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img