Emergency Movie: खासदार आणि बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत (Kangna Ranaut) लोकसभा निवडणुकांपासून चांगलीच चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi) येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून कंगना खासदार बनून संसदेत गेली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात खासदारकीची कंगनाने शपथ घेतली. आता खासदारकीच पद हाती घेतल्यानंतर कंगना इंदिरा गांधी बनून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) सिनेमाच्या प्रदर्शनाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
Emergency Movie: गेल्या अनेक दिवसांपासून चाहते कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची वाट बघत आहेत. २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, नंतर चित्रपटाची रिलीज डेट बदलून ४ नोव्हेंबर करण्यात आली होती. या रिलीज डेटला सुद्धा चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित होऊ शकला नाही. यानंतरही प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं सांगण्यात आलं होत. मात्र काही कारणांमुळे चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. आणि आता अखेर लोकसभा निवडणुकीनंतर क्वीन खासदारकी निवडून आल्यानंतर कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे.
कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारणार असून या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येणाऱ्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे आता कंगनाच्या या बहुचर्चित चित्रपटासाठी चाहत्यांची मात्र प्रतीक्षा संपली आहे.
“हे गलिच्छ मनोरंजन आहे”, देवोलिना भट्टाचार्जीचा तो ट्विट व्हायरल
‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावर भाष्य करण्यात येणार आहे. १९७५ साली झालेला आणीबाणीचा काळ तो चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगना रणौतने केलं असून यात ती इंदिरा गांधी यांची हुबेहूब भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत भुमिका चावला, अनुपम खेर, सतिश कौशिक, श्रेयस तळपदे यांच्याही मुख्य भूमिका दिसणार आहेत.