लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 13 जागांसाठी (Elections 2024)देशात पोटनिवडणूक होणार आहे. सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यंदा भाजपला बहुमत मिळाले नाही तर दुसरीकडे इंडिया आघाडीने (INDIA Alliance) चांगली कामगिरी करत आपल्या जागा वाढवल्या आहेत. आता सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आमदारांचा राजीनामा किंवा मृत्यू या जागा झाल्याने रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांसाठी 10 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
ज्या मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे त्यात बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील (West Bengal) रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील (Tamil Nadu) विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलौर, पंजाबमधील जालंधर पश्चिम, हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपुर आणि नालागढ या जागांचा समावेश आहे.
Elections 2024 राजस्थानात काँग्रेस जोमात
राजस्थानात लोकसभा (Rajasthan Election) निवडणुकीत यंदा काँग्रेसने चांगली कामगिरी केली. दहा जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसचा (Congress Party) आत्मविश्वास वाढला आहे. आता राज्यात पाच जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा यांनी निवडणूक समित्या गठित केल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात चार सदस्यीय समिती देखरेख ठेवणार आहे. प्रचार आणि रणनीती ठरवण्याचे कामही या समितीकडे सोपवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील पाच आमदार विजयी झाल्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या मतदारसंघात यामध्ये झुंझुनू, दौसा, देवली-उनियारा, खींवसर आणि चौरासी पोटनिवडणूक होणार आहे.
… मोठा स्पोट होणार आहे, रोहित पवारांचं खळबळजनक विधान
Elections 2024 मध्य प्रदेशात भाजप सुसाट
मध्य प्रदेशात लोकसभा निवडणुकी भाजपने क्लीन स्वीप केले आहे. सर्वच 29 जागा जिंकल्या. येथे काँग्रेसचा सुपडा साफ झाला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाचाही पराभव झाला. त्यानंतर या राज्यात पोटनिवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत अमरवाडा विधानसभा मतदारसंघातील 332 बूथपैकी 200 बूथवर भाजप उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत अमरवाडामध्ये भाजपाला विजय मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
Elections 2024 तामिळनाडूत तिरंगी लढत
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकचा बालेकिल्ला असणाऱ्या विक्रवंडी मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. येथील आमदार एन. पुघाझेंडी यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत भाजप, द्रमुक आणि नाम तमिलर काची (एनटीके) यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मुख्य विरोधी पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.