23.1 C
New York

Lok Sabha Speaker Post Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक

Published:

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा (Lok Sabha Speaker Post Election) ट्विस्ट आला आहे. अध्यक्षपदावर सहमती न झाल्याने विरोधकांनीही आपला उमेदवार दिला आहे. के. सुरेश (K. Suresh) विरोधी पक्षांचे उमेदवार असतील. सत्ताधारी एनडीएने अध्यक्षपदासाठी (NDA) उमेदवाराची घोषणा केली असून पुन्हा ओम बिर्ला यांनाच (Om Birla) संधी दिली आहे. यानंतर बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. देशात पहिल्यांदाच स्पीकर पदासाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपद सत्ताधारी पक्षालाच मिळतं हा आतापर्यंतचा प्रघात राहिला आहे. यंदा मात्र परिस्थिती थोडी बदलली आहे. विरोधी पक्षांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. जर विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद मिळालं तर अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी अट ठेवली होती. मात्र यावर सहमती होऊ शकली नाही अशी माहिती आता समोर येत आहे.

आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या संमतीने स्पीकर नियुक्त केला जात होता. पण यंदा ही परंपरा मोडीत निघाली आहे. याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चर्चा केली होती. राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) सांगितले होते की विरोधक अध्यक्षपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहेत मात्र उपाध्यक्षपद विरोधकांना मिळालं पाहिजे. या अटीवर राजनाथ सिंह यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

राजनाथ सिंह यांनी (Rajnath Singh) काल सांगितलं होतं की तुम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. यानंतर सगळ्याच विरोधी पक्षांनी सांगितलं होतं की उपाध्यक्ष पद मिळालं तरच पाठिंबा देऊ. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पीएम मोदी म्हणतात सहकार्य करा. पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्वच्छ नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी राजनाथ सिंह यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तेव्हा खर्गे उपस्थित होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी कोणतेही नाव सुचवण्यात आले नव्हते.

जरांगेंवर गुन्हा दाखल करा अन्यथा… तरुणाच्या पत्राने यंत्रणा हादरली

Lok Sabha Speaker Post Election कोन आहेत के. सुरेश?

के. सुरेश आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1989, 1991, 1996, 1999, 2009, 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. के. सुरेश केरळमधील मावेलिक्कारा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सर्वात अनुभवी खासदार असतानाही त्यांना प्रोटेम स्पीकर निवडले गेले नाही त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.

Lok Sabha Speaker Post Election काँग्रेसने तोडली परंपरा

सरकारमधील लोकांचं म्हणणं आहे की विरोधकांना उपाध्यक्ष पद देण्याचा कोणताच नियम नाही. आतापर्यंतची परंपरा तोडण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. दुसऱ्या लोकसभेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसच्याच हुकूम सिंह यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. आघाडी सरकारच्या काळात अनेक वेळा असं घडलं आहे की सरकारचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाने अध्यक्षपद आपल्या मित्रपक्षांना देऊन उपाध्यक्षपद आपल्या जवळ ठेवलं आहे.

Lok Sabha Speaker Post Election सर्वसंमतीनेच अध्यक्ष निवडीचा इतिहास

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा गणेश वासुदेव मावळकर यांची निवड झाली होती. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वसंमतीने अध्यक्ष निवडले गेले आहेत. बाराव्या लोकसभेचं अध्यक्षपद टीडीपीच्या जीएमसी बालयोगी यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यानंतरच्या तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बालयोगी यांनाच नियुक्त करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षपदावर असतानाच हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांना अध्यक्ष करण्यात आले होते.

मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील पहिल्या यूपीए सरकारच्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी सीपीआय नेते सोमनाथ चॅटर्जी लोकसभा अध्यक्ष बनले होते. 2009 ते 2014 पर्यंत मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. यानंतर भाजपाच्या सुमित्रा महाजन सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. अध्यक्षपदासाठी आतापर्यंत कधीच निवडणुका घेतल्या नाहीत हा इतिहास आहे. परंतु, आता या पदासाठी विरोधकांनीही उमेदवार दिल्याने पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img