21 C
New York

Dombivli : पाणी टंचाईने त्रस्त महिलांचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवली पूर्वेकडील (Dombivli) शेलार नाका येथील इंदिरानगर झोपडपट्टीत गेली आठ दिवस पाणी येत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर मंगळवार २५ तारखेला पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याला घेराव घातला. भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारीत पाणी येत नाही तोवर आपल्याला येथून जाऊ देणार नाही असा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी नागरिकांच्या या समस्येची दाखल घेत पालिका आयुक्तांनी पाणी समस्या लवकरात लवकर दूर करा असे सांगितले.

डोंबिवलीतील शेलार नाका येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयात महिलांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी चंद्रकांत पाखले यांना पाणी का येत नाही याचा जाब विचारला. संतप्त महिलांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोवर टॅकरने पाणी पुरवठा नको असे महिलांनी अधिकाऱ्यांन बजावले.तर कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका अधिकारी पाखले यांना शेलार नाका येथे पाणी पुरवठा योग्य दाबाने करावे असे सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांना शेलार नाका येथे पाणी पुरवठा सुरळीत करा असे सांगितल्याचे कांबळे यांनी येथील नागरिकांना सांगितले. याबाबत येथील नागरिकांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले.

पालिका अधिकारी पाखले यांना विचारले असता ते म्हणाले, नेतीवेली येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे दुरुतीचे काम सुरु असल्याने येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र दोन दिवसात येथीलयोग्य दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल.

शेलार नाका येथील इंदिरानगर झोपडपट्टीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरीक पुरते वैतागले होते. याची दाखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना संपर्क करत येथील पाणी समस्या दूर करावी असे सांगितले. यावर पालिका आयुक्तांनी येथील पाणी पुरवठा लवकर लवकर दूर करू असे आश्वासन दिले.नागरिकांची समस्या दूर केल्याने येथील महिला वर्ग व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img