शंकर जाधव, डोंबिवली
रेल्वे प्रशासनाकडून एफओबीचे काम सुरु असून याकरता फलाटावरील छत काढण्यात आले. याचा त्रास प्रवासी वर्गाला होत असल्याने पावसाळ्यात छत्री घेऊन लोकलची वात पाहावे लागते. याची दाखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेने (YuvaSena) मंगळवार 25 तारखेला डोंबिवली (Dombivli) स्टेशन प्रबंधकाला जाब विचारला.
५ नंबर फलाटावरिल अपुरी शेड, ३ नंबर फलाटावरिल महिला डब्बा समोर प्रवाशांना उभे राहण्यासाठी अपुरी जागा, फलाटावरिल अस्वच्छता गृह, उशीरने धावणारी लोकल सेवा व इतर नागरिकांच्या तक्रारींबाबत युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे, सागर जेधे, सागर दुबे यांसह पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली स्टेशन प्रबंधक अग्रवाल यांना जाब विचारला. सदर तक्रारी रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर सोडविण्यात आले नाही तर युवासेना डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रशासना विरोधात आंदोलन करील.यावेळी युवासेनेचे युवासेना निरीक्षक अभिषेक चौधरी,उप जिल्हा अधिकारी योगेश म्हात्रे,विधानसभा अधिकारी सागर दुबे, विधानसभा समन्वयक स्वप्निल विटकर, डोंबिवली शहराधिकारी सागर जेधे,शहर समन्वयक ओंकार तांबे, शाखा प्रमुख परेश म्हात्रे, पवन म्हात्रे, विपुल म्हात्रे, बाळकृष्ण सोबत उपस्थित होते.
याबाबत युवासेना सचिव दिपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवली स्थानकावर एकीकडे रेल्वे प्रशासनाकडून एफओबीचे काम सुरु असून यासाठी प्लॅटफॉर्म वरील छत काढण्यात आले आहे यामुळे प्रवाशांना पावसात भिजत ट्रेन पकडावी लागत आहे. दुसरीकडे महिला स्वच्छतासह इतर सुविधा डोंबिवली स्थानकात नसल्याने प्रवासी वर्गात व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत या समस्या बाबत डोंबिवलीतील काही प्रवाशांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अधिवेशानात असल्याने शिवसेनेच्या युवा संघटनेकडून स्टेशनची पाहणी केली. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर निवेदन देत रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत असेल त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे.