23.1 C
New York

Hair Highlight: केस हायलाईट करायची इच्छा आहे ? पण त्याआधी या गोष्टी नक्की जाणून घ्या

Published:

Hair Highlight: आजकाल केस हायलाईट करणं हा अनेक तरुण-तरूणींमध्ये लोकप्रिय फॅशन ट्रेंड बनला आहे. स्वतःचा लूक चेंज करण्यासाठी किंवा अजून स्टायलिश दिसण्यासाठी बऱ्याच महिला आणि पुरुषांनी हा नवीन फॅशन ट्रेंड फॉलो केला आहे. हेअर हायलाईटिंगमध्ये (Hairs Highlights) बरेच प्रकार आहेत ज्यामध्ये केसांना विविध प्रोफेशनल असणारे रंग लावले जातात, ज्यामुळे तुमची पर्सनॅलिटी चेंज होते आणि तुमच्या लूकलाही चेंज येतो. केसांना हायलाइट केल्याने केसांचा पोत तर बदलतोच, पण ते चमकदार होण्यास सुद्धा मदत होते. पण केसांना हायलाईट करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं खरंच महत्वाचं आहे. केसांना रंग लावल्यानंतर किंवा कोणतीही प्रतिक्रिया केल्यानंतर केसांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे.

Hair Highlight: तरुण-तरुणींना तर माहितीच असतं की त्यांना त्यांच्या स्किन टोननुसार केसांसाठी कोणता रंग निवडला पाहिजे. मात्र, तुमच्या स्किन टोननुसार केसांसाठी कोणता रंग निवडला पाहिजे, किती केस हायलाईट केले पाहिजेत या सर्व गोष्टींकडे नीट लक्ष देऊनच त्याची आधी माहिती घेऊन मगच हायलाईट करण्याचा पर्याय निवडावा. केसांना हायलाईट करण्याआधी व केस कलर केल्यांनतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि काय केलं नाही पाहिजे हेही जाणून घेऊयात.

बर्फावर योगासने करत,थेट रचला विक्रम !

काय केलं पाहिजे ?
१) हेअर हायलाईट करण्याआधी, तुम्ही तुमच्या केसांना कोणता रंग सूट होईल हे आधी ठरवलं पाहिजे. केसांना हायलाईट करण्याआधी रंग निवडताना स्किन टोन, केसांचा नैसर्गिक रंग आणि ऋतू कोणता आहे, या सगळ्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सुंदर लूक दिसण्यासाठी बेज किंवा ब्राउन रंग निवडता येतो. रंग नेहमी त्वचेच्या टोननुसार असावा हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला उन्हाळ्यात हायलाईट करायचं असेल तर एकदम हलका रंग निवडा आणि हिवाळ्यात करायचा असेल तर डार्क रंग निवडा.

२) प्रत्येकाला आपले केस खूप महत्वाचे असतात. त्यामुळे केसाची तितकीच काळजी सुद्धा घेतली पाहिजे. केसांचा प्रश्न आहे तर, केस हायलाईट्स करायचे असतील तर प्रोफेशनल कलरिस्टकडूनच केस हायलाईट्स करून घ्या. कारण, कोणाकडूनही केले तर हे कदाचित महागात पडू शकत. तुमच्या ओळखीचं पार्लर किंवा एखादा प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट चांगले व योग्य उत्पादने वापरत असेल आणि तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देईल अशाच पार्लर मध्ये जा. तुम्हाला तुमच्या स्किन टोनवर कोणता रंग शोभेल हे सुद्धा ठरविण्यात तो तुमची मदत करू शकेल.

३) केसांना हायलाईटस केल्यानंतर, चांगला किंवा उत्तम दर्जाचा असणारा शॅम्पू आणि कंडिशनर वापरणं महत्वाचं आहे. कारण त्याच्या मदतीने हायलाईट दीर्घकाळ टिकून राहतील आणि केसांचं नुकसान सुद्धा होणार नाही.

काय करणं टाळलं पाहिजे ?
१) गरम टूल्स वापरणं टाळलं पाहिजे, उदाहरणार्थ केस हायलाईट केल्यानंतर केसांसाठी वेगवेगळ्या मशीन्स आपण वापरतो स्ट्रेटनर्स, रोलर्स, कर्लर्स ही उपकरणे टाळली पाहिजेत. या सर्व उपकरणाने तुमच्या केसांना हानी पोहचू शकते.

२) गरम पाणी किंवा कोणतेही प्रॉडक्ट्स वापरू नका. केस हायलाईट केल्यानंतर केसांसाठी सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करा आणि खूप गरम पाण्याने अंघोळ करणं टाळा. त्यामुळे केसांची छिद्रे ओपन होऊ शकतात, किंवा केसांचा रंग फिका होऊ शकतो.

३) हायलाईट्ससाठी एकापेक्षा जास्त रंग वापरणं टाळावे, तुमचे केस २ पेक्षा जास्त हायलाईट्स करू नका. अनेक रंगामुळे तुमचे केस वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांच्या संपर्कात येऊ शकतात, आणि वेगवेगळ्या रसायनाचा वापर तुमच्या केसात झाला की तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकत. त्यामुळे केसांची काळजी घ्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img