23.1 C
New York

MahaYuti : विधानसभेवर महायुतीचाच झेंडा फडकणार दरेकरांचा विश्वास

Published:

मुंबई

भाजपा प्रत्येक (BJP) निवडणूक गांभीर्याने घेते. यश-अपयश मिळो. आत्मचिंतन करून येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाते. ही आमची पद्धत, प्रथा-परंपरा आहे. थोडाफार आम्हाला सेटबॅक मिळालेला आहे. निश्चितच त्याचा विचार करून भाजपा ताकदीने महायुती सोबत (MahaYuti) निवडणुकीला सामोरे जाईल आणि विधानसभेवर महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

शिक्षक व पदवीधर निवडणुकीवर बोलताना दरेकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक मतदार हा बहुतांशी भाजपच्या पाठीशी आहे. निश्चितच उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत विधानपरिषदेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपाला चांगले यश मिळेल.

लाडली बहना योजनेवर बोलताना दरेकर म्हणाले की, पीडित, शोषित, जो वंचित घटक आहे त्यासाठी सरकारने या योजना करणे आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. मध्य प्रदेशात जी लाडली बहना योजना आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली. तेथील महिलांना त्या योजनेच्या माध्यमातून आनंद आणि दिलासा मिळतोय. अशा प्रकारची योजना जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. किंबहुना तशा प्रकारची योजना आणावी अशी भुमिका आमची असेल.

तसेच बिनविरोध निवडणूक झाली तरी निश्चितच स्वागतार्ह ठरेल. प्रत्येक पक्षाची मते ठरलेली आहेत. कोण किती जागा जिंकू शकतो याचे अत्यंत स्पष्ट चित्र असते. बिनविरोध निवडणूक होणे हे कधीही विधिमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे असते, असेही दरेकर म्हणाले.

पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर झालेल्या कारवाईवर बोलताना दरेकर म्हणाले की, पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. राज्य सरकार, गृह खात्याने गंभीर दखल घेतली आहे. तेथे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना ठेचून काढण्याची भुमिका राज्य सरकारची आहे. येणाऱ्या काळात अशा गोष्टी पूर्णपणे आवाक्यात येतील, असा विश्वास आहे.

सूर्यकांता पाटील यांच्या घरवापसीवर बोलताना दरेकर म्हणाले की, राजकारणात पक्षांतर होतच असते. फक्त एवढेच आहे दुसऱ्यावर फोडाफोडीचा आरोप करत असताना आपल्याकडे दुसऱ्या पक्षातून येताहेत त्यामुळे आपल्या बोलण्याला किती नैतिकतेचा आधार होता हे यावरून स्पष्ट होते.

दरेकर म्हणाले की, चर्चा आणि जागावाटप हे काही माध्यमातून किंवा पब्लिकली होत नसते. यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बसून असणारी प्राप्त परिस्थिती, त्या-त्या पक्षाची मतदार संघातील क्षमता, इलेक्टिव्ह मेरिट या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जागावाटप होत असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img