3.6 C
New York

Maharashtra Politics : भाजपाच्या गडात मुसंडी मारण्याची CM शिंदेंची प्लॅनिंग

Published:

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (Maharashtra Politics) जबर दणका बसला. 23 जागा जिंकणारा भाजप फक्त 9 जागांवर आला. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट वाढला. 15 जागा लढवून 7 जागा जिंकल्या. या यशाच्या जोरावर आता शिंदे गटाने दबावाच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. यंदा विदर्भात भाजपला मोठा दणका बसला. फक्त दोन जागा जिंकता आल्या. भाजपाची कमी झालेली ताकद ओळखून येथे किमान 12 जागा लढवण्याची तयारी शिंदे गटाने केल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (Eknath Shinde) विदर्भात होते. येथे भंडाऱ्यात त्यांनी साडेपाचशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला. याच वेळी अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता विदर्भातील किमान बारा जागा लढण्याची तयारी शिंदे गटाने चालवली आहे. विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी किमान (Maharashtra Assembly Elections) बारा जागा मिळाल्याच पाहिजेत अशी रणनीती तयार करण्यात येत आहे. भोंडेकरांचा पक्ष प्रवेश याच रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics बारा जागांवर लढण्याची शिवसेनेची तयारी

मागील काही वर्षांपासून विदर्भात भाजपला चांगलं (BJP) यश मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे (Nitin Gadkari) दोन्ही नेते विदर्भातूनच येतात. या भागात भाजपाची चांगली ताकद असतानाही लोकसभेत मात्र फटका बसला. लोकसभेच्या एकूण 11 जागांपैकी फक्त दोन जागा भाजपला जिंकता आल्या. काँग्रेसने मात्र जोरदार (Congress Party) मुसंडी मारली. अशा परिस्थितीत भाजपाच्या पिछेहाटीचा फायदा घेऊन विधानसभेत कुरघोडी करण्याचा प्लॅन शिंदे गटाने आखला आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिंदे गट विदर्भात बारा जागा लढवणार असल्याच्या वृत्ताला पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दुजोरा दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रेझ वाढत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. असे वाघमारे म्हणाले. येथील रामटेक आणि उमरेडच्या जागांवर शिंदे गटाचा दावा आहे. सन 2019 च्या निवडणुकीत शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आशिष जयस्वाल येथून निवडून आले आहेत. तर उमरेड मतदारसंघातल काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेल्या राजू पारवेंना शिंदेंनी पक्षात घेतलं आहे.

Maharashtra Politics शिंदे गटाचं विदर्भात वजन किती ?

राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट मिळालं परंतु, त्यांचा पराभव झाला. आता आगामी विधानसभेसाठी पुन्हा त्यांना तिकीट मिळू शकतं. विदर्भातील भंडारा, यवतमाळ आणि बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार आहेत. तर येथील काही अपक्ष आमदार शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात अशा परिस्थितीत विदर्भात शिंदे गटाचा दावा अधिक मजबूत होत आहे. मात्र, भाजपने या घडामोडींवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. विदर्भात खरंच इतक्या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील का, किती जागा मिळतील, त्या जागा कोणत्या असतील, जागावाटपावरून दोन्ही पक्षांत खटपट होणार का, या प्रश्नांची उत्तर मिळण्यास अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img