21 C
New York

Ujjwal Nikam : निकमांची सरकारी वकील नियुक्ती रद्द करा, प्रकरण कोर्टात

Published:

मुंबई

मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवणारे वरिष्ठ फायदे तज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्य सरकारकडून उज्वल निकम यांची सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून करण्यात आलेली नियुक्तीला आरोपी विजय पालांडे (Vijay Palande) यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात पालांडे यांनी न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली असून यावर उद्याला सुनावणी होणार आहे.

गँगस्टर विजय पालांडे उज्ज्वल निकाम यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावरील नियुक्ती रद्द करा, अशी मागणी आरोपी विजय पालांडे याने मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकाद्वारे केली आहे. या याचिकेत पालांडे याने निकाम यांची ओळख पूर्णपणे बदलली असल्याचे म्हटले आहे. जनतेच्या नजरेत निकम यांचे विचार, अजेंडा, उद्देश सर्व काही बदलले आहे. ते आता भाजपचे मोठे नेते असल्याचा दावा केला आहे.

विजय पालांडे साल 2012 मध्ये उघडकीस आलेल्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. दिल्ली व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्यूसर करणकुमार कक्कड यांची हत्याचा आरोप पालांडे याच्यावर आहे. निकम भाजपचे नेते असल्यामुळे ते राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. पक्षाची प्रतिष्ठा जनमानसात उंचावण्यासाठी ते आता काम करतील. यासाठी हाय-प्रोफाइल प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा करण्यासाठी कोणत्याही थराला जातील, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे. आता पालांडे याच्या अर्जावर 28 जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img