पुन्हा एकदा पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री होत असल्याने पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सोशल मीडियावर (Social Media) देखील पुण्यातील पब्जमध्ये ड्रग्सची विक्री (Pune Drugs Case) होत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांना निर्देश देत शहरातील बेकायदेशीर पब्जवर (Bulldozer Pattern) कठोर कारवाई करण्यासाठी सांगतिले आहे.
याच बरोबर नव्याने शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करून यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कारवाई करा आणि पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहे. तर दुसरीकडे 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर पोर्श अपघात (Porsche Accident Case) प्रकरणानंतर पोलिसांनी शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
भाजपाच्या गडात मुसंडी मारण्याची CM शिंदेंची प्लॅनिंग
मात्र पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) एका पबमध्ये काही तरुण ड्रग्ज घेताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुणे पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतपर्यंत पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. मात्र आता पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्याने शहरात अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.