21 C
New York

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या ‘ह्या’ दिग्गज फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

Published:

टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup) च्या स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. यंदाच्या टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचं आव्हान अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने संपुष्टात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, तो आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. या खेळाडूच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 जिंकले. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला केले विश्वचषक स्पर्धेबाहेर

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्त झाला आहे. वॉर्नरने याआधीच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपनंतर टी 20I फॉर्मेटला रामराम करणार असल्याचं वॉर्नरने म्हटलं होतं. आता ऑस्ट्रेलियाचं सुपर 8 मधून पॅक अप झाल्याने वॉर्नरचा टीम इंडिया विरुद्धचा टी 20 सामना हा अखेरचा ठरला. वॉर्नरने अखेरच्या सामन्यात 6 धावा केल्या. वॉर्नरने निवृत्तीबाबत अधिकृतरित्या सोशल मीडियाद्वारे घोषणा केलेली नाही. मात्र त्याने याआधीच याबाबत जाहीररित्या म्हटलं होतं.

T20 World Cup डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द-

डेव्हिड वॉर्नरने 112 कसोटी सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये 8786 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 3 वेळी कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे. तर 36 शतक आणि 37 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईट रेटने त्याने 6932 धावा केल्या आहेत. वनडेत डेव्हिड वॉर्नरने 22 शतक आणि 33 वेळा अर्धशतक झळकावले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 139.77 च्या स्ट्राईक रेटने डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर यामध्ये 1 शतक आणि 28 अर्धशतक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img