23.1 C
New York

Arvind Kejriwal : केजरीवालांची तुरुंगवारी संपेना, जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

Published:

नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशातील अनेक त्रुटींचा हवाला देत ईडीच्या (ED) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे कथित दारू घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) अटकेत असलेले केजरीवाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.

आज जामीनाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने म्हटले की, भक्कम पुराव्यांचा विचार करता येणार नाही अशी कनिष्ठ न्यायालयाची टिप्पणी पूर्णपणे अयोग्य आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या भूमिकेवरून असे दिसून येते की त्यांनी पुराव्यांचा विचार करताना आपले डोके लावले नाही. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवालांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश सदोष असल्याचे सांगत केजरीवाल यांना दिलासा मिळू नये, असे म्हटले होते.

केजरीवाल यांना 20 जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या जामीनाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img