21 C
New York

T20 World Cup : ऐतिहासिक विजयानंतर, रशीद खानला तालिबानकडून फोन

Published:

टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सुपर 8 फेरीत मंगळवारी (25 जून) किंग्सटाउन येथे पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयासह अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठली. याने प्रथमच एकदिवसीय किंवा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता 27 जूनला दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हींसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. बांग्लादेश आधीच स्पर्धेबाहेर पडला होता. परंतु, या सामन्यात बांग्लादेश विजयी झाला असता तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचला असता. परंतु, असं घडलं नाही. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शानदार खेळ करत बांग्लादेशच्या हातातून सामना खेचून घेतला. या विजयासह अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. त्यांचा या विजयाने ऑस्ट्रेलियाला मात्र स्पर्धेबाहेर केले आहे. आता सेमी फायनलचं चित्रही स्पष्ट झालं आहे. सेमी फायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या चार संघांनी एन्ट्री घेतली आहे.

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या ‘ह्या’ दिग्गज फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने फक्त 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. बांग्लादेशकडे अनुभवी फलंदाज आहेत त्यामुळे ते हा सामना सहज जिंकतील असे वाटत होते. परंतु, मधल्या ओव्हर्समध्ये अफगाणी गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. एकामागोमाग एक विकेट घेतल्या. त्यामुळे सुरुवातीला वेगात धावा केलेल्या असतानाही बांग्लादेशचे फलंदाज दडपणात आले.

T20 World Cup राशिद खानने एक मोठी गोष्ट सांगितली

परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांनी रशीद खान यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संघाचे अभिनंदन केले. तसेच उर्वरित स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राशिद खानने अफगाणिस्तानच्या तरुणांना प्रेरणा देणारे असे यशाचे वर्णन केले. रशीद म्हणाला, “मला वाटतं की उपांत्य फेरी अफगाणिस्तानात मायदेशी परतलेल्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आम्ही १९ वर्षांखालील स्तरावर ही कामगिरी केली आहे. पण आम्ही ते या स्तरावर केले नाही, अगदी सुपर 8 आमच्यासाठी पहिला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img