3.8 C
New York

Child Food Poverty : जगातील 18 कोटी मुलांची उपासमार

Published:

अन्न सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताची स्थिती फारशी (Child Poverty in India) चांगली राहिलेली नाही. अन्न सुरक्षेच्या (Food Safty) बाबतीत भारत जगातील आठवा खराब देश आहे. दक्षिण आशियात अफगाणिस्ताननंतर वाईट अवस्था भारताचीच आहे. युनिसेफच्या ताज्या (UNICEF) अहवालातून ही माहिती समोर आली आहे. UNICEF 2024 बाल पोषण रिपोर्ट ‘Child Food Poverty बालपणीच्या सुरुवातीच्या दिवसात पोषणाचा अभाव’ या अहवालातून असे समोर आले आहे, की भारत अशा 20 देशांपैकी एक आहे जिथे 2018 ते 2022 पर्यंत 65 टक्के बालकांना आवश्यक पोषण आहार मिळत नाही. जगातील प्रत्येक चार मुलांपैकी एक मूल उपासमारीच्या संकटाला तोंड देत आहे. युनिसेफच्या या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे याची माहिती घेऊ या..

Child Poverty in India कोणत्या देशात चाईल्ड पॉवर्टी सर्वाधिक

युनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात चाईल्ड पॉवर्टी 40 टक्के आहे. ही स्थिती खूप काळजीत टाकणारी आहे. याआधी सोमालिया (63 टक्के), गिनी 54 टक्के, गिनी बिसाऊ 53 टक्के, अफगाणिस्तान 49 टक्के, सिएरा लिओन 47 टक्के, इथिओपिया 46 टक्के आणि लायबेरिया या देशात 43 टक्के चाईल्ड पॉवर्टी आहे. या आकडेवारीवरून असे स्पष्ट होत आहे की भारतातील असंख्य मुलांना अन्न मिळत नाही. पाकिस्तानबाबत विचार केला तर येथे 38 टक्के चाईल्ड पॉवर्टी आहे आणि चीनमध्ये हे प्रमाण 10 टक्के आहे.

Child Poverty in India दक्षिण आशियात भारताची स्थिती

भारतात 40 टक्के चाईल्ड पॉवर्टी तर आहेच शिवाय 36 टक्के मुले मध्यम बाल खाद्य गरिबीच्या आहारी गेले आहेत. या दोन्हींची बेरीज केली तर हे प्रमाण 76 टक्क्यांपर्यंत पोहोचते. यावरून असे दिसते की अन्न सुरक्षेच्या बाबतीत दक्षिण आशियात अफगाणिस्ताननंतर भारत दुसरा देश आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आशियातील अन्य देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.

सुनीता विल्यम्स अंतराळातच अडकल्या, नेमकं काय आहे प्रकरणं

Child Poverty in India प्रत्येक चौथ्या मुलाची होतेय उपासमार

युनिसेफच्या अहवालानुसार जगात पाच वर्षांपेक्षा कमी वयाची 18.1 कोटी मुले गंभीर खाद्य संकटाच्या विळख्यात आहे. जगात 27 टक्के मुले अशी आहेत ज्यांना पोषक आहार मिळू शकत नाही. याचा अर्थ प्रत्येक चौथे मुल कुपोषित आहे. याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडत आहे. कुपोषणाची ही समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येने सरकारी यंत्रणांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे काम केलं आहे.

Child Poverty in India गंभीर बाल खाद्य समस्या म्हणजे काय?

युनिसेफने म्हटले आहे की लहान मुलांना दररोज 8 प्रकारच्या खाद्य पदार्थांपैकी 5 प्रकारचे खाद्य पदार्थ जरूर दिले पाहिजेत. यापेक्षाही कमी आहार मिळत असेल तर ते मूल गंभीर खाद्य गरिबीमध्ये गणले जाते. या खाद्य पदार्थांमध्ये आईचे दूध, धान्य, कंद आणि केळी, डाळी, डेअरी प्रोडक्ट्स, मांस, अंडे, व्हिटॅमिन ए ने समृद्ध फळे आणि पालेभाज्या तसेच अन्य फळे आणि पालेभाज्यांचा यात समावेश आहे.

Child Poverty in India 44 कोटी मुले खाद्य गरिबीच्या विळख्यात

युनिसेफच्या अहवालानुसार 100 देशांतील पाच पेक्षा कमी वय असणारी 44 कोटी बालके खाद्य गरिबीच्या संकटाला तोंड देत आहेत. यातील 18.1 कोटी बालके गंभीर खाद्य गरिबीत आहेत. ज्या देशात लोकसंख्या जास्त आहे तिथे ही समस्या मोठी गंभीर आहे. लोकसंख्या वाढीमुळे या देशात मुलभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीही अपुरी पडत आहे. दक्षिण आशियातील बहुतांश देशांत ही समस्या आहे. युनिसेफने अहवाल तयार करताना या गोष्टी विचारात घेतल्या नसल्याची चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img