23.1 C
New York

Gautam Gambhir : ..तर मी रोहित, विराटला संघाबाहेर काढणार; BCCI ला गंभीरने सांगितलं

Published:

भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एकमेव अर्ज प्रशिक्षक पदासाठी दाखल झाला असून काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची मुलाखत सुद्धा घेतली होती. या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने १-२ नव्हे तर तब्बल ५ अटी बीसीसीआयला घातल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, गौतम गंभीर व रमण या दोघांनी प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीसमोर (सीएसी) उत्तम सादरीकरण करून दोघांनीही मुलाखतकर्त्यांना प्रभावित केलं. असं असलं तरी मीडियाच्या अहवालानुसार अजूनही गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय भारताच्या माजी सलामीवीराची नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर ठेवलेल्या काही अटींची चर्चा होत आहे.

Gautam Gambhir भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यासाठी गौतम गंभीरच्या अटी:

गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी पाच अटी घातल्या होत्या आणि वृत्तानुसार बीसीसीआयने त्या सर्व मान्य केल्या आहेत, असं समजतंय. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या माजी सलामीवीराने नवीन मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी घातलेल्या पाच अटी खालीलप्रमाणे..

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात पाऊस आला तर काय होणार ?

Gautam Gambhir गंभीरच्या 5 मुख्य अटी कोणत्या ?

  • बोर्डाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय संघाच्या क्रिकेट ऑपरेशन्सवर त्याचे पूर्ण नियंत्रण असेल, अशी मागणी गंभीरने केली.
  • गौतम गंभीर स्वतः फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षकांसह स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडेल.
  • तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, पाकिस्तानमधील 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या चार वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असू शकते. जर हे खेळाडू भारताला जिंकवू शकले नाहीत तर त्यांना संघातून वगळण्यात येईल. मात्र, तिन्ही फॉरमॅटमधून खेळाडूंना वगळण्यात येईल कि नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही.
  • चॅम्पियन्स ट्रॉफी ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असेल
  • वेगळा कसोटी संघ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img