25.1 C
New York

Parliamentary Session : आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन

Published:

आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू होतय. 2014 ते 2024 असा मोदी सरकारचा कालावधी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असले तरी हा तिसरा कार्यकाळ मोदी सरकार म्हणून नाही तर एनडीए सरकार म्हणून सुरू होतोय. (NEET) आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. (NDA government) हा शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे.(Parliamentary Session) त्यानंतर २६ तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून २७ तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी लोकसभेत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत.

Parliamentary Session बहिष्काराची भूमिका कायम

एनडीए सरकारने भाजपचे वरिष्ठ सदस्य भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते सातव्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. मात्र आठ वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या के. सुरेश यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. महताब यांना सहकार्य करण्यासाठी राष्ट्रपतींनी नेमलेल्या समितीमध्ये काम न करण्याची भूमिका ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी घेतली आहे. या समितीमध्ये भाजपचे राधामोहन सिंह व फग्गनसिंह कुलस्ते यांच्यासह काँग्रेसच्या सुरेश, द्रमुकचे टी. आर. बालू व तृणमूल काँग्रेसच्या सुदीप बंडोपाध्याय यांचा समावेश आहे. सुरेश १९९८ आणि २००४ अशा दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाले होते, तर महताब सलग सातव्यांदा निवडले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, यावरून विरोधकांचे समाधान झालं नसून त्यांची बहिष्काराची भूमिका कायम राहिली आहे.

विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Parliamentary Session नीट पेपर लीक प्रकरणावरून संघर्ष

आजपासून सुरू होत असलेले अधिवेशन अठराव्या लोकसभेचे विशेष स्वरूपाचे असेल. मात्र, ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांची रणनीती आहे. तसंच, केंद्र सरकारने केलेल्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून अधिवेशनापूर्वीच वाद उफाळून आला आहे. त्यातच लोकसभेत विरोधकांचं संख्याबळ आधीच्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक झाल्याने एनडीए सरकारची मोठी कसोटी लागणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाची धुरा भाजपच्या खासदाराकडे तर उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या खासदाराकडे दिली जाण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपद सहसा विरोधी पक्षाकडे दिले जाते. मात्र अध्यक्षपदासाठी भाजपने आग्रह धरला असल्याने उपाध्यक्ष पदावर एनडीएच्या घटक पक्षाला दिलं जाऊ शकतं.

Parliamentary Session उपाध्यक्षपद कुणाकडं जाणार?

अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महताब यांना राष्ट्रपती भवनावर हंगामी लोकसभा अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वप्रथम शपथ दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींनी हंगामी अध्यक्षांच्या मदतीसाठी नेमलेल्या समितीसदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर मंत्रिपरिषदेचे सदस्य आणि शेवटी आद्याक्षरांच्या क्रमानुसार प्रत्येक राज्यातील सदस्याला शपथ दिली जाईल. २६ तारखेला लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आधीच्या दोन्ही कार्यकाळांमध्ये उपाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले होते. हे पद विरोधी पक्षांकडे असावं, असा संकेत असल्याने ‘इंडिया’ आघाडीकडून तशी मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र, एनडीएकडून हे पद मित्रपक्षाला दिलं जाण्याची शक्यता असल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img