18.6 C
New York

Hajj Pilgrims : हज यात्रेकरुंच्या मृत्यूच सत्र सुरूच

Published:

यावर्षी सौदी अरेबियामध्ये तब्बल १३०० पेक्षा अधिक लोकांचा हज यात्रेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सौदीतील अधिकाऱ्यांनी रविवारी (Hajj pilgrims) वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढलं असल्याचं जाहीर केलं आहे. (Hajj) दरम्यान, सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनीही याबाबत माहिती दिली आहे.

Hajj Pilgrims १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द

यातील १३०१ मृत्यूंपैकी ८३ टक्के अनधिकृत यात्रेकरू होते. जे पवित्र शहर मक्का आणि आसपास हज विधी पार पाडण्यासाठी वाढत्या तापमानात लांब अंतर चालत होते. ९५ यात्रेकरूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत, त्यापैकी काहींना राजधानी रियाधमध्ये उपचारांसाठी विमानाने नेण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक मृत यात्रेकरूंकडं ओळखीची कागदपत्रं नसल्याने ओळख प्रक्रियेला उशीर झाल्याचंही अल-जलाजेल यानी सांगितलं. यातील मृतांना ब्रेकडाउन न देता मक्का येथे पुरण्यात आलं असही ते म्हणाले.

FC रोडवरील पबमध्ये ड्रग्ज पार्टी, आयुक्तांची मोठी कारवाई

Hajj Pilgrims १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द

यामध्ये जे मृत झाले आहेत त्यांच्यामध्ये ६६० हून अधिक इजिप्शियन लोकांचा समावेश आहे. कैरोमधील दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी ३१ वगळता सर्व अनधिकृत यात्रेकरू होते. इजिप्तने १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द केले आहेत, ज्यांनी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्यास मदत केली. याची दखल घेत सर्वांचे परवाने आता रद्द करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच, बहुतेक मृतांची नोंद मक्काच्या अल-मुईसेम परिसरातील इमर्जन्सी कॉम्प्लेक्समध्ये झाली असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Hajj Pilgrims सर्वाधिक मृत्यू चेंगराचेंगरीमुळे

हजमध्ये सातत्याने मृत्यू होत आले आहेत. २ दशलक्षाहून अधिक लोक पाच दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. या यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरी होते. तर अनेकदा साथीचे आजारही पसरले आहेत. २०१५ मध्ये, मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २४०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी आतापर्यंतची सर्वाधिक प्राणघातक होती. तर त्याच वर्षाच्या सुरुवातीला मक्काच्या ग्रँड मशिदीत एक वेगळी क्रेन कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img