9.5 C
New York

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : आईची साडी, गळ्यात फक्त १ हार …अन् सोनाक्षीने बांधली झहीरशी लग्नगाठ

Published:

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अखेर सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या तुफान चर्चा रंगल्या होत्या. अखेरीस नोंदणी पद्धतीने लग्न करून अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. सोनाक्षी आणि झहीर या दोघांचे कुटुंब लग्नाला उपस्थित होते. दोघेही गेली सात वर्ष एकमेकांना डेट करत होते.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल २३ जून २०१७ पासून एकमेकांसोबत आहेत. बरोबर सात वर्षांनी या जोडप्याने आयुष्याचा नवा प्रवास चालू केला आहे. दोघांच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हांच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या लाडक्या लेकीचं लग्न म्हणून लग्नासाठी खास सजावट देखील करण्यात आली होती. त्यामुळे सर्व प्रेक्षकांचं लक्ष सोनाक्षीच्या लग्नाकडेच लागलं होत. अखेर आता सोनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या अकाऊंटवरून नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी देऊन खुश केलं आहे.

सोनाक्षी आणि झहीरने लग्नात पेस्टल रंगाचा पेहराव केला होता. अभिनेत्रीने खास सफेद रंगाची साडी नेसली होती तर झहीर देखील बायकोच्या साडीला मॅचिंग असा सदरा घातला होता. झहीरच्या सदऱ्यावर सुंदर असं भरतकाम करण्यात आलं होतं. अशातच सोनाक्षीने लग्नात नेसलेल्या सुंदर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. सोनाक्षीची साडी कोणत्याच डिझाइनरने डिझाइन केलेली नव्हती. सोनाक्षीने नोंदणी पद्धतीने लग्न केलं त्यात तिने स्वतःच्या आईची म्हणजेच पूनम सिन्हा यांची साडी नेसली होती. सोनाक्षीने या साडीवर एक उठून दिसेल असा हार घातला होता. याशिवाय तिच्या हातात सोनेरी रंगाच्या पारंपरिक डिझाईन असलेल्या बांगड्या होत्या. हे सर्व दागिने तिच्या आईचेच होते. तसंच अभिनेत्रीने केसात भरगच्च गजरा माळल्याचं दिसून आलं. आईची सुंदर साडी, गळ्यात एक हार, लाईट शेड असलेली पीच रंगाची लिपस्टिक आणि या संपूर्ण लूकमध्ये सोनाक्षी अतिशय सुंदर दिसत होती.

सोनाक्षी आणि झहीरसाठी २३ जून हा दिवस खूपच खास आहे. यामागचं कारण असं की दोघांसाठीसुद्धा या दिवसाला फार महत्व आहे. २०१७ मध्ये याच दिवशी दोघे एकत्र आले होते अन् आज बरोबर सात वर्षांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान, आता फक्त आणि फक्त सोनाक्षी झहीर यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकत आहेत. सर्व बॉलीवूडमधल्या कलाकारांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img