गेल्या काही वर्षापासून शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे रिलेशशीपमध्ये होते. ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. दरम्यान, आज सोनाक्षी झहीर इक्बाल सोबत विवाह बंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न करून त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली.
बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्न केलं. सोनाक्षी आणि झहीरचा विवाह सोहळा दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधीचे विधी शुक्रवारपासून सुरु झाले होते. पहिल्या दिवशी मेहंदी सोहळा पार पडला. यानंतर मुंबईतील ‘रामायण’ बंगल्यात शनिवारी सोनाक्षीच्या घरी खास पूजा ठेवली होती आणि आज दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षीने लग्नात सुंदर ऑफ व्हाइट साडी नेसली होती. ज्याला मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीरने सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवाणी परिधान केली होती.
नीट पेपरफुटी प्रकरणी लातुरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल
या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करून सोनाक्षीही आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. तिनं लिहिलं की, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय गेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही देवांच्या आशीर्वादाने, आता आम्ही पती-पत्नी आहोत…सोनाक्षी आणि झहीर…23.06.2024, असं सोनाक्षीनं लिहिलं. मुंबईतील दादर भागातील बस्टियन रेस्टॉरंटमध्ये दरम्यान, आता त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. अनेकांना या पार्टाीला आमंत्रित करण्यात आले आहे.
Sonakshi Sinha सोनाक्षी आणि झहीरची प्रेमकहाणी
सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाला. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कुबली दिली होती.