मुंबई
मराठा आरक्षणाची ( Maratha Reservation ) एकीकडे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांची मागणी आहे की, त्यांना ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) ओबीसी कोट्यातून सरसकट हवं आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी बांधवांचा त्याला विरोध आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी महाराष्ट्रातील ( Reservation ) प्रमुख मराठा नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. असे वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Alliance ) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे ( Siddharth Mokale ) यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाच्या संदर्भात वाद पेटवला जात आहे. महाराष्ट्रातील गावा-खेड्यांमध्ये आता तणाव निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, महाराष्ट्रातील या वादाला थांबवण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांचा पक्ष हा नेमका कुठल्या बाजूने उभा आहे ?जरांगे यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे की ओबीसी बांधवांची भूमिका त्यांना मान्य आहे, हे त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे.