मुंबई
राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी मूळ पक्ष आणि चिन्ह अजित पवार ( Ajit Pawar ) यांना देण्यात आला होता. सध्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला ( Sharad Pawar group ) निवडणूक आयोगाने ( Election Commission ) तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाले होते. तर काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह ( Symbol ) मिळालं होतं. या पिपाणी चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून याचा फटका पक्षाला बसल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. तर दोन चिन्हातील गोंधळामुळे काही उमेदवार पडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. हा गोंधळ आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.
(Sharad Pawar group letter to Election Commission to remove Pipani symbol from election list)
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हामुळे पुन्हा एकदा फटका बसू नये, यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. शरद पवार गटाने पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून काढून टाकावं, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून काढून टाकण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचं दार ठोठावावं लागेल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढवली. मात्र निवडणूक आयोगाने या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिलं होतं. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही. यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र पिपाणी चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, असा दावाही शरद पवार गटाने केला होता. कारण सातारा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. तर या मतदारसंघात पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला 37 हजार मते पडली होती. याचपार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.