21 C
New York

IND vs AUS : मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले

Published:

टी-20 वर्ल्डकपमध्ये ( T20 World Cup) सुपर आठच्या महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघात होत आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली भोपळाही न फोडता बाद झाला. पण कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तुफानी फटकेबाजी सुरू केली. रोहित शर्माने मिचेल स्टॉर्कची (Mitchell Starc) जबरदस्त धुलाई केली आहे. रोहित शर्मा याने 19 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. रोहित शर्मा सध्या 89 धावांवर खेळत आहे. त्याने तब्बल आठ षटकार, तर सात चौकार मारले आहेत.

त्याने स्टॉर्कच्या ओव्हरमध्ये चार षटकार आणि एक चौकार मारत त्याची जबरदस्त धुलाई केली. स्टार्कला दोन्ही ओव्हर महागात पडल्या. दोन ओव्हरमध्ये त्याने तब्बल 34 धावा दिल्या. त्यात चार षटकार आणि दोन चौकार आहेत. रिषभ पंतही 15 धावांवर बाद झाला आहे. दहा ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट्सच्या बदल्यात 114 धावा झाल्या. रोहित शर्माला सूर्यकुमार यादव साथ देत आहे. विशेष म्हणजे, 2.4 षटकानंतर टीम इंडियाच्या 28 धावा झाल्या होत्या, त्या सर्व धावा एकट्या रोहित शर्माने केल्या होत्या. रोहित शर्माने स्टार्कच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. स्टार्कच्या दुसऱ्या षटकात रोहित शर्माने चार षटकात आणि एक चौकार ठोकत तब्बल 29 धावा वसूल केल्या. रोहित शर्मापुढे मिचेल स्टार्कनं गुडघे टेकले होते. डावखुरा मिचेल स्टार्क रोहित शर्मासमोर फिका पडला.

..तर मी रोहित, विराटला संघाबाहेर काढणार; BCCI ला गंभीरने सांगितलं

IND vs AUS रोहित शर्माची वादळी फलंदाजी –

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल स्टार्क यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. विराट कोहली शून्यावर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. रोहित शर्माने फक्त 14 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये पाच षटकार आणि 2 चौकार ठोकले. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने एक बाद 43 धावांपर्यंत मजल मारली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img