23.1 C
New York

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शपथ घेताना राहुल गांधींनी दाखवले संविधान

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान विरोधकांकडून नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार हा मुद्दा धरून विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. आज पासून सुरू झालेल्या 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात शपथ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभापती यांच्या कडे जात असताना संसदेमध्ये विरोधकांकडून संविधानाची प्रत दाखवण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि इतर विरोधी नेत्यांनी संविधानाच्या प्रती दाखवल्या. राहुल गांधी संविधानाची प्रत घेऊन सभागृहात बसले होते. त्यांनी हसत आणि हात जोडून पंतप्रधान मोदींच्या अभिवादनाला उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ विरोध आंदोलन सुरु केले आहे. नरेंद्र मोदी हे लोकशाही परंपरा नष्ट करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. संविधानाची प्रत हातात घेऊन काँग्रेस नेते खर्गे, सोनिया गांधी आणि विरोधी पक्षांचे नेते घोषणाबाजी करत आहे. 18 व्या लोकसभेत संसद सदस्य लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत सभागृहात झळकवत होते. सभागृहाबाहेरही विरोधक आक्रमक दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर आदींसह अन्य खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले तेव्हा विरोधकांनी NEET-NEET, शेम शेम असे म्हणण्यास सुरुवात केली. पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन करत आहोत, जिथे संसद परिसरात महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता. आम्ही संविधानाच्या रक्षणात उभे आहोत. संसद परिसरातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले. याचाही विरोध विरोधी पक्षांनी केला. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आमचा हा विरोध नरेंद्र मोदींना संविधानानुसार काम करण्याचे आवाहन करण्यासाठी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img