25.1 C
New York

Loksabha Session : टाळ्यांच्या कडकडाटात मोदींनी घेतली शपथ

Published:

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन (Loksabha Session) आजपासून सुरू झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर आदींसह अन्य खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मोदींनी टाळ्यांच्या कडकडाटात शपथ घेतली. तर, दुसरीकडे मोदींच्या शपथविधीवेळी विरोधक संविधानाच्या रक्षणासाठी घोषणाबाजी करतना दिसले. मोदींनी खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वांना सर्वांना नमस्कार करतना दिसत आहेत. तर, दुसरीकडे राहुल गांधीही (Rahul Gandhi) मोदींना शुभेच्छा देताना दिसत आहेत. या शुभेच्छा देतेवेळी राहुल गांधींनी हातात संविधानाची प्रत धरली आहे. (PM Modi Sworn As A Member of Parliament For Third Time)

Loksabha Session आजचा दिवस गौरवाचा

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी केलेल्या संबोधनात त्यांनी संसदीय लोकशाहीतील आजचा दिवस गौरवशाली आणि गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवीन संसदेत हा शपथविधी सोहळा होत आहे. आतापर्यंत जुन्या संसदेच्या इमारतीत हा सोहळा होत होता. या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. तिसऱ्या टर्ममध्ये पूर्वीपेक्षा 3 पट जास्त काम करू अशी गॅरंटीही मोदींनी (Narendra Modi) देशवासियांना दिली. विरोधक अधिवेशनकाळात अर्थपूर्ण चर्चा करतील अशी आशा आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधक लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे.

अधिवेशाच्या पहिल्या दिवशी मोदींनी दिली ही ‘गॅरंटी’

Loksabha Session ‘नीट’सह अन्य मुद्दे संसदेत गाजणार

आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू झाले असून, सध्या देशभरात नीट परीक्षांचा गोंधळ सुरू असून, 2014 ते 2024 असा मोदी सरकारचा होता. मात्र, आता जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असले तरी, हा तिसरा कार्यकाळ मोदी सरकार म्हणून नाही तर एनडीए सरकार म्हणून सुरू झाला आहे. एनडीए सरकारने भाजपचे वरिष्ठ सदस्य भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते सातव्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. मात्र आठ वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या के. सुरेश यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या निवडीवरून अधिवेशनकाळात गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img