26.6 C
New York

MNS : शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी मनसे लवकरच आंदोलन करणार

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

के.व्ही. पेंढारकर म्ह्विद्याल्याच्या प्रशासनाविरोधात महाविद्यालयाच्या समोर सेव पेंढारकर महाविद्यालय मोहिमे अंर्तगत माजी विद्यार्थी यांनी सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला दहा दिवस उलटले आहे. सोमवार २४ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली. महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष देसाई यांचीही भेट घेतली. या मनमानी कारभार विरोधात मनसे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता लवकरच आंदोलन करू असे मनसे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई विद्यापीठ प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसेच्या शिष्टमंडळाने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे संस्थाचालक प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक संतोष गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, मनविसे कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिप्तेश नाईक, शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष प्राजक्ता देशपांडे, यतिन पांडगावकर, प्रतीक देशपांडे, शहर संघटक हरिश पाटील, संजय चव्हाण यांनी चर्चा केली.त्यानंतर शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक गांगुर्डे म्हणाले, मनसेच्या आमच्या आंदोलनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोवर मनसे आवाज उठविणार. आम्ही संस्थाचालक आहे देसाई यांची भेट घेतली. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते.या निवेदनाचे त्यांनी उत्तर हे विद्यापीठ पब्लिक युनिवर्सिटी अॅकटचे उल्लंघन करणारे असून पत्र आहे. स्वतःच्या आडमुठपणा आणि स्वतःचे स्वायत्तापण राखण्यासाठी हे केले होते.याबाबत समज देण्यासाठी आम्ही आलो होतो. अनुदानित महाविद्यालय बंद करून विनाअनुदानित करत आहात याचे कारण काय हे विचारले असता देसाई यांनी उतर दिले कि मला विद्यापीठाकडून तसेच केंद्र सरकारच्या विद्यापीठाच्या आयोगाकडून स्वायत्ता बहाल झाली आहे.त्यामुळे त्यामुळे मी काहीही शकतो. मात्र त्यांना आम्ही सांगितले कि आम्हाला कुठेही पूर्णपणे स्वायत्ता मिळाली नाही. शिक्षकांना एका खोलीत का बसवले याचाही जाब विचारला.शासकीय कामात बाधा शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकविण्यास तयार आहेत.

शिक्षकांना पगार मिळाला नाही याबाबत पत्रकारांना विचारले असता ते म्हणाले शासनाचे म्हणणे आहे कि जे इन्चार्ज प्रिसिंपल आहेत त्यांची नेमुक केली नाही त्यामुळे बिल आले नाही म्हणून पगार दिले नाही. मनसेचा याबाबत संघर्ष सुरु आहे. याचा जाब विचारू अमित ठाकरे वतीने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन विचारणार आहे.

महाविद्यालयात बाउन्सर व सुरक्षा रक्षक का ठेवण्यामागील कारण विचारले असता जे विद्यार्थी वर्गात बसत नाही त्यांच्यासाठी बाउन्सर व सुरक्षा रक्षक ठेवल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता विद्यापीठाने अशी परवानगी दिली नाही. विद्यार्थी वर्गात बसत नसतील तर त्यांच्यासाठी विद्यापीठाकडून कारवाई केली जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img