23.1 C
New York

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या एकेकाळच्या समर्थकाला काळं फासण्याची घटना

Published:

छत्रपती संभाजी नगर

मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) राज्यात वातावरण तापलेले आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे याकरिता मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना नंतर आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना 30 दिवसाची मुदत आरक्षणासंदर्भात करिता मागितली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या एकेकाचे खंदे समर्थक असलेल्या डॉ. रमेश तारक ( Ramesh Tarak ) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास विरोध केल्यामुळे काळं फासण्यात आलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. आता, दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण, या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचं दिसून येत आहे. कारण, जरांगे यांच्या उपोषणास विरोध केल्यामुळे त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याला काळं फासण्यात आलं आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी 2 महिन्यांपूर्वी दिले होते, 2 महिन्यांनी ही घटना घडली आहे. आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हटले, पण त्यांना माझा वाढदिवस आज नाही, असे सांगितल्यानंतरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेहऱ्याला काळ फासलं आहे, यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी डॉ. रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. अंतरवाली सराटमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याने हे काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहले होते. तसेच, ग्रामस्थांच्या सह्या घेऊन या मागणीचे निवेदनही जालन्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावातच आपलं उपोषण केलं. आता, त्याच विरोधाचा राग धरुन, झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांच्या चेहऱ्यावर काळी शाई ओतून चेहऱ्याला काळं फासलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img