21 C
New York

Leopard : ओतूर जवळील पाथरटवाडीत बिबट्या जेरबंद

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर ( ता.जुन्नर ) येथील पाथरटवाडी, मालकरवस्ती रोड लगत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे चार वर्ष वयाचा बिबट्या (Leopard) जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना काकडे म्हणाले की, ओतूर येथील पाथरटवाडी जवळील मालकरवस्ती रोडच्या शेजारील हेमंत राजश्री यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता.या पिंजऱ्यात सोमवार दि.२४ रोजी पहाटे चार वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूर वनविभागाला मिळाली, सदर माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनसेवक गणपत केदार, किसन केदार ,गंगाराम जाधव यांनी बिबट्या जेरबंद झालेल्या ठिकाणी जाऊन,येथील स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर पाथरट,पोपट मालकर,संजय मालकर,मयुर मालकर,अक्षय मालकर,शुभम गिते,संतोष गिते,सुनील भास्कर,महेश गिते,सार्थक गिते यांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेऊन, माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img