4.2 C
New York

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी लातुरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल

Published:

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातून आता मोठी बातमी समोर आली आहे. (Latur Pattern) या प्रकरणात लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Neet ) तसंच, इतर दोघांवरही लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (NEET Paper Leak) विशेष म्हणजे यातील एका शिक्षकाला आता अटक करण्यात असून दुसरा शिक्षक फरार झाला आहे.

या प्रकरणात घोटाळे करून शिक्षक धाराशिवमार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आतापर्यंत चार नावे समोर आली आहेत. यातील एक आरोपी हा दिल्लीचा असल्याची माहितीही उघड झाली आहे. दरम्यान, जलील पठाण याला अटक करण्यात आली आहे. तर, संजय जाधव हा फरार झाला आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके त्याला पकडण्यासाठी रवाना केली आहे. संजय जाधव काल ताब्यात घेण्यात आलेला आज फरार कसा झाला असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकसभेत नव्या-जुन्यांची मांदियाळी

नीट परीक्षेदरम्यान मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर येत आहे. देशभरातील विविध राज्यात याप्रकरणी कारवाई केली जात आहे. पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्याचवेळी, पेपरफुटीचे राज्यातील लातूर कनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये दोन शिक्षकांचा सहभाग असल्याचं उघड झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, पीएचडी धारक आहेत आणि स्वत:चे कोचिंग क्लासेस देखील चालवतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img