8.4 C
New York

Rohit Sharma : रोहितच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक

Published:

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळ दाखवला आहे. फलंदाजीला आलेल्या रोहितने पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा केल्या. मात्र यानंतर त्याने गोलंदाजांना फटकवलं. रोहितने मिचेल स्टार्कविरुद्ध डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि फोर मारल्या. या ओव्हरमध्ये स्टार्कने 29 धावा दिल्या.

Rohit Sharma रोहितच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक


रोहित शर्माने 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतकही आहे. रोहितने भारतीय डावाच्या ५व्या ओव्हरमध्येच अर्धशतक झळकावले. या T20 विश्वचषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितने यापूर्वी 22 चेंडूत अर्धशतक केले होते. रोहित शर्माने 50 धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 52 धावा होती.

मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले

Rohit Sharma T20 विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक

युवराज सिंग- 12 चेंडूत इंग्लंड विरुद्ध

केएल राहुल- 18 चेंडू विरुद्ध स्कॉटलंड

रोहित शर्मा- 19 चेंडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध

युवराज सिंग- 20 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सूर्यकुमार यादव- झिम्बाब्वे विरुद्ध २३ चेंडू

Rohit Sharma रोहितचे 200 टी-20 आंतरराष्ट्रीय सिक्स

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 200 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड ही त्याने आपल्या नावे केला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर 195 सिक्स होते. मिचेल स्टार्कविरुद्ध त्याने चार सिक्स मारले. त्यानंतर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पाचवा सिक्स मारला. भारतीय कर्णधाराच्या कारकिर्दीतील हा 157 वा सामना आहे. तसेच तो सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img