18.6 C
New York

Pune Police : FC रोडवरील पबमध्ये ड्रग्ज पार्टी, आयुक्तांची मोठी कारवाई

Published:

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ‘पबमधील ड्रग्ज सेवन’ प्रकरणी पोलीस (Pune Police) आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात ⁠शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरिक्षक अनिल माने आणि ⁠सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केले आहे. (Police Inspector Anil Mane and Dinesh Patil of Shivajinagar Police Station suspended in drug case)

शनिवारी मध्यरात्री काही मुले पबमधील पार्टीत ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पुण्यातील एफसी रोडवीर एका नामंकित पबमधील असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि पबवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेल मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या पाच जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर हॉटेलही सील करण्यात आले.

राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या एल ३ नावाचा एक बार आहे. दिलेल्यावेळे पेक्षा अधिक वेळेपर्यंत हा बार सुरू होता. दोन मालकांनी हा बार पुढे तीन जणांना चालवायला दिला होता. एका इव्हेंट मॅनेजरने 40 ते 50 लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली. रात्री 1.30 नंतर बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. तिथून दुसऱ्या गेटने आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. एल ३ बार सील करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणीनगर परिसरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने बेधुंद अवस्थेत कार चालवताना तरुण-तरुणीला चिरडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील बार आणि हॉटेलांवर कारवाई करण्याची मागणी आग्रहाने केली जात होती. काही पब आणि बार चालकांवर कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, अद्यापही काही पब रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचं दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img