रमेश तांबे, ओतूर
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष स्वर्गीय वल्लभ बेनके यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता काम केले. आपल्या कडक शिस्तीमुळे आणि प्रशासनावरील भक्कम पकडीमुळे सर्वसामान्यांच्या कामाला वेग आला आणि जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने हरितक्रांती आणि शैक्षणिक क्रांती त्यांच्यामुळे शक्य झाली, असे हृद्य गौरवोदगार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी ओतूर येथे बोलताना काढले.
जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ओतूर येथील नंदलाल लॉन्स मध्ये झालेल्या वारकरी कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने वळसे पाटील बोलत होते. समस्त बेनके परिवाराच्यावतीने तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक ,वादक आणि वारकरी यांचा सन्मान सोहळा स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या जयंतीनिमित्त ओतूर येथे आयोजित केला होता. या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार छोटे माऊली म्हणून प्रचलित असणारे हरिभक्त परायण माऊली महाराज कदम यांचे संकीर्तन आयोजित केले होते. खूप मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची मांदियाळी यावेळी दिसून आली. सर्व वारकऱ्यांचा यथोचित सन्मान यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सुद्धा स्वर्गीय माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या आठवणींना उजाळा दिला. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले की,”मी माझ्या वडिलांचे संस्कार कधीच विसरणार नाही. वारकरी ही आपल्या ला नेहमी ऊर्जा व प्रेरणा देणारी मंडळी आहेत. त्यांचा कधीच विसर पडू देणार नाही. आणि आगामी काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह जुन्नर तालुक्यात आयोजित केला जाईल.”सर्व उपस्थितांबद्दल आणि वारकऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी जवळजवळ दहा हजार चा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी मंत्री वळसे यांनी आगामी काळात ओतूरला बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी ५० लाख रूपयांची मदत जाहीर केली. या कार्यक्रमासाठी अपूर्वा वळसे पाटील, रामेश्वर शास्त्री, तुळशीराम सरकटे, सत्यशील शेरकर, पांडुरंग पवार, शरद लेंडे, रघूनाथ लेंडे, विनायक तांबे, गंगाराम डुंबरे, गुलाब नेहरकर,विशाल तांबे, बाजीराव ढोले, अशोक घोलप,धोंडीभाऊ पिंगट, विलास पडवळ, ज्ञानेश्वर खंडागळे, देवराम लांडे, दीपकऔटी, जी.के.औटी,बाबू पाटे, महादेव वाघ, राजश्री बोरकर, उज्वला शेवाळे, भाऊसाहेब देवाडे, अनंतराव गटकळ, दिलीप डुंबरे,नेताजी डोके, गजानन घोडे, माऊली शेळके, वल्लभ शेळके, सुदाम घोलप, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, सावकार पिंगट, बाबा बोरचटे, बबनराव तांबे, मंगेश काकडे, तुकाराम गायकर, बाबाजी शिंदे, धोंडीभाऊ पानसरे, ईश्वर केदारी, दयानंद डुंबरे, प्रज्ञा तांबे, संतोष तांबे, जयप्रकाश डुंबरे, प्रियांका दाते, प्रशांत दाते, आदि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने वारकरी बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुळशीराम महाराज सरकटे, रामेश्वर महाराज शास्त्री, अमोल महाराज महाकाळ, तुकाराम महाराज डावखर, पंढरीनाथ महाराज डुकरे, भगवान महाराज खेडकर, भास्कर महाराज ढोबळे, चतुराबाई पिंगट, राम महाराज कदम, पांडुरंग महाराज चांदड, अविनाश महाराज गरड यांचा सत्कार करण्यात आला. येत्या आठ दिवसांमध्ये प्रत्येक गावागावात जाऊन वारकऱ्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. राजेंद्र महाराज फापाळे यांनी कार्यक्रमाचे प्रlस्ताविक तर भाऊसाहेब खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आमदार अतुल बेनके यांनी सर्वांचे स्वागत केले.संतोष ढोबळे यांनी सर्वांचे आभार मानले.