Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटिटीचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Big Boss OTT 3) रिऍलिटी शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु झाला आहे. खास करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) स्ट्रीम होणाऱ्या या रिऍलिटी शोमध्ये बिग बॉसच्या घरात १६ स्पर्धक गेले आहेत. या स्पर्धकांमध्ये बॉलीवूडमधला अभिनेता रणवीर शौरीचाही समावेश आहे. अशातच बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी रणवीर शौरीने त्याच्या मनातली खदखद बाहेर पडली आहे. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात रणवीर शौरीने (Ranveer Shaurie) आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) या चित्रपटातदेखील रणवीरने सलमान खानसोबत काम केलं आहे. मात्र बिग बॉसच्या घरात रणवीरने केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
रणवीर शौरीला नाही काम…
Bigg Boss OTT 3: बिग बॉसच्या घरात रणवीर शौरीला न ओळखणारे काही स्पर्धक आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असणारी शिवानी कुमारी (Shivani Kumari) सुद्धा त्यात आहे. रणवीरचा आधी शिवणीसोबत वाद झाला त्यानंतर दोघांमध्ये फ्रेंडशिप झाली. दोघांमध्ये चांगला संवाद झाला. अशातच दोघांच्या संवादात शिवाणीने रणवीरच्या कामाबद्धल विचारल की, तुम्ही काय करता त्यावर रणवीर म्हंटला की, मी अभिनेता आहे आणि मी चित्रपटांमध्ये काम करतो.
आईची साडी, गळ्यात फक्त १ हार …अन् सोनाक्षीने बांधली झहीरशी लग्नगाठ
पुढे शिवणीने रणवीर शौरीला विचारलं की, तुमचं काम कसं सुरु आहे. त्यावर रणवीर म्हणाला की, माझ्याकडे आज जर काम असतं तर मी इथे नसलो असतो. आता माझ्याकडे काहीच काम नाहीये. त्यानंतर रणवीर शिवणीच कौतुक करत म्हणाला की, तुझं काम चांगलं आहे, तू स्वतः निर्मिती करतेस आणि त्यात स्वतःलाच कमावतेस. आज काल नवीन तंत्रज्ञान आलं आहे आम्ही जुने काळातले आहोत असं रणवीरने म्हंटल.
दरम्यान, रणवीर शौरीने अनेक बॉलीवूडमधल्या चित्रपटात काम केलं आहे. ‘आजा नचले’, ‘सिंग इज किंग’, ‘प्यार के साइड इफेक्ट’, ‘मोह माया मनी’ अशा अनेक चित्रपटात अभिनेता झळकला आहे. ‘सॅक्रेड गेम्स’ या प्रसिद्ध वेब्सिरीजमध्ये देखील रणवीर दिसला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी रणवीर शौरी राम मंदिराबाबत केलेल्या विधानामुळे तो चर्चेत आलेला पाहायला मिळालं होत.