21 C
New York

Akshay Kumar : अक्षय कुमारची आई-वडिलांना अनोखी श्रद्धांजली

Published:

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतो. यावेळी त्याने त्याचे दिवंगत आई-वडिल (late Parents) हरी ओम भाटिया आणि अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला. आज (24 जून) अक्षय कुमारने मुंबईतील वांद्रेतील खेरवाडी पश्चिम दितवती मार्गावर वृक्षरोपण मोहिमेचे (Tree Plantation) आयोजन केलं होतं. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेकर ग्रीन अगेन फाउंडेशन यांचे देखील सहकार्य अक्षय कुमारला लाभले.

सकाळी नऊ वाजता या वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामध्ये अक्षय कुमार सह बीएमसी आयुक्त आणि प्रशासक श्री भूषण गगराणी यांची उपस्थिती होती त्यावेळी तब्बल २०० झाड लावण्यात आले. तसेच या वृक्षारोपणाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, वृक्षारोपण हे निसर्गाला त्याच्याकडून घेतलेलं परत देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तसेच माझ्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मी हे करत असताना हे माझ्यासाठी अत्यंत खास आहे.

सोनाक्षी आणि झहीर अडकले विवाह बंधनात

दरम्यान जगभरात सातत्याने हवामान बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. भारतात प्रचंड तापमान वाढ जाणवत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. त्यामुळेच अभिनेता अक्षय कुमारने हा पुढाकार घेत मुंबईमध्ये वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन केलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img