21 C
New York

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Published:

मुंबई

वरळीत राजकीय चिखल झाला आहे. पण राजकारणात कितीही चिखल झाला तरी वरळीच कमळ फुलू देणार नाही, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी भाजपावर निशाणा साधला होता. रविवारी वरळीत फूटबॉल मॅचदरम्यान आदित्य ठाकरेंनी विधान केले होते. त्यांच्या या टीकेला अद्यापतरी भाजपाच्या कोणत्याही नेत्याने उत्तर दिले नसले तरी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये या नव्या विधानावरून वाद-प्रतिवाद पाहायला मिळणार आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, आता पुढच्या वेळेस वरळीमधून उभ राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहा, असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतं मिळवली. लोकांची दिशाभूल एकदा करतील. मात्र, वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वरळीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षा होती की 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त सहा हजार मताधिक्य त्यांना मिळाले. त्यांना जे वाटत होते की मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे, हे लोकांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले. या ठिकाणी 19 टक्के जे मतदान शिवसेनेला पडायचे त्यापैकी 14 टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झाले, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img