टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा (AUS vs AFG) सामना झाला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत या सामन्यात यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा सुपर-8 मधील सामन्यात 21 धावांनी पराभव केला आहे. भारतात झालेल्या 2023 च्या वन-डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एकतर्फी खेळी खेळून अफगाणिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजमध्ये पराभव करत अफगाणिस्तानने हा बदला घेतल्याचे बोलले जात आहे.
अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झालं. अफगाणिस्तानने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे विजयाची स्क्रिप्ट लिहिता आली. T20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला विजय आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचे सलामीवर रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झदरान या दोघांनी शतकी भागिदारी केली. दोंघांनी अर्धशतकं करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी अफगाणिस्तानला 118 धावांची सलामीची भागिदारी करत मॅचमध्ये पुढं ठेवलं. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी दावसंख्या उभारता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमबॅक करत अफगाणिस्तानला 148 धावांवर रोखलं. पॅट कमिन्सनं हॅटट्रिक देखील याच मॅचमध्ये केली.
बांगलादेशला नमवत भारताने आपला उपांत्य फेरीचा मार्ग केला सोपा…
AUS vs AFG अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी –
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत . मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.
AUS vs AFG कमिन्सची लागोपाठ दुसरी हॅट्ट्रिक
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने या मॅचमध्ये सुद्धा हॅट्ट्रिक घेतली. T20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हा कारनामा केला. T20 वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 3 विकेट घेणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्याशिवाय जंपाने 2 विकेट घेतल्या.
AUS vs AFG ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?
ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 149 धावांच टार्गेट होतं. त्यांच्या बॅटिंगची ताकद लक्षात घेता हे फार मोठ टार्गेट नव्हतं. पण अफगाणिस्तानच्या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. ते लक्ष्यापासून 21 धावा दूर राहिले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेम मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या.