23.1 C
New York

Mahayuti : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत ‘या’ फार्मूल्यावर चर्चा

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर ( Lok Sabha Elections ) आता विधानसभा निवडणुकीचे ( Assembly Elections ) वेध लागले आहे. राज्यात महायुतीला ( Mahayuti ) लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपा संदर्भात महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे महायुतीत जागा वाटपावरून झालेल्या विलंबामुळे उमेदवार घोषित करण्यात विलंब झाला होता हा विलंब विधानसभा निवडणुकीत होऊ नये याकरिता महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवाव्यात, अशी मागणी काही नेत्यांनी केल्याची माहिती आहे. तर या प्राथमिक चर्चेनुसार भाजप 155 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर 60-65 जागांवर शिवसेना आपले उमेदवार देणार आहेत.

यात मोठे 3 तर छोटे 3 पक्ष आहेत. यात 3 लहान मित्र पक्षांना 15 जागा सोडण्यात येणार आहे. तर भाजप 155 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर 60-65 जागा शिवसेनेला सुटणार असल्याची माहिती आहे. तर अजित पवार यांना 50-55 जागा सोडण्याचा विचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील विधानसभा निवडणुकीत 95 ते 100 जागांवर उमेदवार देण्यास आग्रही आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी तशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे. अशातच भाजपने 150 हून अधिक जागा लढवण्याची भूमिका घेतल्यास शिंदे-पवार गट नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img