देशभरात सध्या ‘NEET’परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याच्या बातमीने चांगलच वादळ घातलं आहे. (NEET) विद्यार्थ्यांनी केलेल्या या आरोपानंतर तपास यंत्रणा चांगलीच हादरली आहे. सध्या ही तपास यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागल्याचं चित्र आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीप्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. (Paper Leak) याप्रकरणात शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
NEET अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार
एटीएसकडून ताब्यात घेतलं असून सध्या या दोन्ही शिक्षकांची कसून चौकशी सुरू असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे तपासात नेमकं काय समोर येतं, याकडं सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या NEET परीक्षेत देशभरातील अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
नीट परीक्षा गैरप्रकारांचा CBI करणार तपास
NEET मोठी गडबड झाल्याचं समोर
गुजरात, पंजाब, हरयाणा आणि बिहार या राज्यांत नीट पेपरफुटीच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात अनुषंगाने आता महाराष्ट्रातही ‘एटीएस’च्या पथकाने तपास सुरू केला आहे. शनिवारी लातूर जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, या गैरप्रकारामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय तसंच ईडीकडे सोपवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे